एकनाथ खडसे कुटुंब पुन्हा मोठ्या संकटात; राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. खडसे यांना मोठ्या रकमेच्या दंडाची नोटीस आली आहे. केवळ खडसेच नाही तर खडसे कुटुंबाला ही नोटीस बजावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

अवैध गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणी खडसे कुटुंबीयांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनाही ही नोटीस बजावण्यात आल्याचं कळतंय.

मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी तक्रार केली होती. चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत या अवैध गौण खनिज उत्खननाचा मुद्दा उपस्थित केला होता. सातोर शिवारात 1 लाख 18 हजार ब्रास अवैध गौण खनिज उत्खनन झाल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी एसआयटीची स्थापना केली होती.

 दरम्यान, या नोटिशीला एकनाथ खडसे अथवा रक्षा खडसे यांनी अद्याप दुजोरा दिला नाही. या प्रकरणी ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .