‘उद्धव ठाकरेंना अटक करा’; ‘या’ नेत्याने केली मागणी

सिंधुदुर्ग | भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तसेच विरोधी पक्षनेते यांच्यावर टीका करत असताना दिसतात. दरम्यान नितेश राणे यांनी आज सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषेद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांना सवाल केला.

काय म्हणाले नितेश राणे?

पुण्यातील दंगलबाबत आपल्याजवळ पुरावे होते. हे मी नाही बोलत. आमचा आरोप उद्धव ठाकरेंवर आहे. नीलम गोरेंवर नाही. नीलम गोरे यांनी माझी बातमी वाचावी. तेव्हाचा बॉस कोण होतं? तर उद्धव ठाकरे यांना अटक करून नेमकं ते काय करतात. याची चौकशी झाली पाहिजे. पुढे त्यांनी मीरा बोरवणकर यांच्या वक्तव्याची देखील चौकशी करावी अशी मागणी केलीये.

नितेश राणे यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला. नागपूर येथे संजय राऊत यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ टाकून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न विचारला. पण तोच नियम केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घराबाहेर सरदेसाई मोर्चा घेऊन येतो.

शिवाय पोलिसांना शिवीगाळ करतानाच व्हिडीओ आमच्याजवळ आहे. उद्धव ठाकरेंचा नातेवाईक असेल तर तुम्ही पोलिसांना शिव्या घालू शकता का?, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे.

थोडक्यात बातम्या –