ड्रग माफिया ललित पाटीलचा खळबळजनक गौप्यस्फोट!

मुंबई | ड्रग माफिया ललित पाटीलला (Lalit Patil) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली असून त्याला अंधेरी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यावेळी ललित पाटीलने खळबळजनक आरोप केलेत.

साकीनाका पोलीस स्थानकातून वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयाच्या दिशेनं जात असताना, मी पत्रकारांशी लवकरच बोलीन, असं ललित पाटील म्हणाला.

अंधेरी न्यायालयात पोहोचल्यानंतर मी ससून रुग्णालयातून पळालो नाही, मला पळवलं गेलं, यामध्ये कोणाकोणाचा हात आहे मी सगळं सांगणार, असं खळबळजनक गौप्यस्फोट ड्रग माफिया ललित पाटीलनं केला आहे.

दरम्यान, ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. ससून रुग्णालयात त्याच्यावरल उपचार सुरू असतानाच त्यानं तिथून पळ काढला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात देखील खळबळ माजली.

महत्त्वाच्या बातम्या-