कोल्हापूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका करताना भाजप नेते गोपीचंद पडळकरांची (Gopichand Padalkar) पुन्हा एकदा जीभ घसरली आहे. शरद पवारांना एवढा माज आणि मस्ती कुठून आली? असा सवाल पडळकरांनी केला. ते कोल्हापुरात बोलत होते.
राज्यात आमची लोकसंख्या दोन कोटी असताना आम्हाला केवळ साडेतीन टक्के आरक्षण दिलं. मग आमच्या वाट्याला काय मिळालं? म्हणून तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, या लबाड लांडग्यापासून सावध राहा, असं गोपीचंद पडळकर म्हणालेत.
जेव्हा आपण चौंडीमध्ये जयंती साजरी करायचो, तेव्हा तिथे कधीही राजकारण होत नव्हतं. पण गेल्यावर्षी 83वर्षांचे शरद पवार चौंडीत आले होते. त्यापूर्वी 83 वर्षांत हा बहाद्दर एकदाही चौंडीत आला नाही, असं गोपीचंद पडळकरांनी म्हटलंय.
82 व्या वर्षी त्यांना चौंडीत जावं वाटलं, तेही नातवाला लाँच करण्यासाठी. त्यावेळी ते भाषणात काय म्हणाले की, माझा नातू ज्या मतदारसंघाचा आमदार आहे. तिथे आहिल्यादेवींचा जन्म झाला आहे. अरे एवढा माज आला कुठून? एवढी मस्ती आली कुठून? तुम्ही आहिल्यादेवींपेक्षा तुमच्या नातवाला मोठं समजता का?, असं पडळकरांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या-