मीरा बोरवणकरांच्या आरोपांवर अजित पवारांकडून खुलासा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Meera Borvankar) यांच्याकडून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत. 2010 मधील या प्रकरणाचा उल्लेख मीरा बोरवणकर यांनी ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकातून केला आहे. येरवडा येथील तीन एकर जमीन पालकमंत्र्यांनी एका खासगी बिल्डरला दिली. पुस्तकात त्यांनी थेट अजित पवार (Ajit Pawar) यांचं नाव घेतलेलं नाही. आता या प्रकरणावर अजित पवारांनी (Ajit Pawar) पत्रकार परिषदेत खुलासा केलाय.

येरवाड्यामधील सरकारी भूखंड विकसनासाठी खासगी विकासकाला देण्याचा निर्णय तत्कालिन राज्य सरकारने घेतला होता. तो निर्णय मी घेतलेला नव्हता. माझ्यावर होत असलेल्या आरोपात तथ्य नाही, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय.

एखादा व्यक्ती पुस्तक लिहित असताना प्रसिद्धीसाठी काही खळबळजनक गोष्टी लिहिल्या की ते पुस्तक प्रकाशझोतात येते, तसा प्रयत्न यावेळी दिसून येतो, असा टोमणाही अजित पवार यांनी बोरवणकर यांना मारला.

दरम्यान, गृह खात्याचं काम होऊ दिलं जात नव्हतं. सरकारचं नुकसान होईल असं काम मी करत नाही. चौकशी करा किंवा अन्य काही करा मला काही फरक पडत नाही. पालकमंत्री आपापल्या परीने काम करत असतात, असं अजित पवार म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-