मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने देखील विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारलं आहे. आता घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांचे कान टोचले आहेत.
विधासनसभा अध्यक्षांनी मीडियाशी बोलायचं नसतं, मात्र आता हे अध्यक्ष सारख माध्यमांशी बोलतात. योग्य निर्णय घेईन म्हणतात, हे अज्ञान आहे, असं सांगत उल्हास बापट (Ullhas Bapat) यांनी राहुल नार्वेकरांना फटकारलं आहे.
त्यांनी रिजनेबल टाइम ठरवूनच द्यायला हवा होता. सुप्रीम कोर्टाला अध्यक्षांना पदावरून हटवण्याचा अधिकार नाही. मात्र आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देत हे पाहव लागेल, असं उल्हास बापट म्हणाले
दरम्यान, आमदार अपात्रतेच्या प्रकरणात सुनावणीस विलंब होत आहे. त्यावरुन विरोधी पक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका करत आहेत. आता उल्हास बापट यांनी देखील नार्वेकरांना सुनावलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- ‘साहेब, ताई आणि दादांच्या गुलामगिरीतून बाहेर पडा’; पडळकरांची पुन्हा पवारांवर टीका
- रूपाली चाकणकरांचा मीरा बोरवणकरांना इशारा, म्हणाल्या ‘पुरावे द्या, अन्यथा…’
- गरब्यासाठी काय पण… पोरींनी केलेला प्रताप पाहून डोक्याला हात लावाल
- ‘आर. आर. पाटील यांनी…’; मीरा बोरवणकरांचा नवा खुलासा
- “महाराष्ट्रात जाती-जातीत भांडण लावणारा लांडगा कोण हे सर्वांना माहिती”