गरब्यासाठी काय पण… पोरींनी केलेला प्रताप पाहून डोक्याला हात लावाल

कोल्हापूर | नवरात्रची (Navratra) तरुण आणि तरुणी आतूरतेने वाट बघत असतात. राज्यात कालपासून रास गरबा तसेच दांडिया सुरु झाले आहेत. महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात हा सण साजरा केला जातो. मात्र गरबा खेळण्यासाठी तरुणींनी भलताच मार्ग अवलंबल्याचं समोर आलं आहे. 

कोल्हापूरात दांडिया खेळायला जात असताना रुग्णवाहिका वापरली त्यामुळे सगळे नागरिक संतप्त झाले. चक्क मुलींनी रुग्णवाहिका वापरली असून रुग्णवाहिकेतून जाताना या रुग्णवाहिकेने 2 दुचाकींना धडक देखील दिली आहे. विशेष म्हणजे ही रुग्णवाहिका शासकीय रुग्णालयाची असून हा सर्व प्रकार कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम परिसरात घडला आहे. 

गरबा खेळायला जात असताना ही रुग्णवाहिका चक्क सायरन वाजवत भरधाव निघाली होती. या रुग्णवाहिकेने एक चारचाकी आणि दोन दुचाकी वाहनांना ओव्हरटेक केले आणि पुढे जाऊन तिने गाडीला धडक दिली.

कोल्हापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींनी गरबा खेळण्यासाठी जायला चक्क सीपीआर रुग्णालयाची रुग्णवाहिका वापरली. त्यामुळे हा प्रकार बघून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-