बच्चू कडूंच्या ‘त्या’ टीकेला सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनंख (WaghNakh) आणणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. एवढंच नाहीतर भाजप (BJP) नेते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे काही दिवसांपूर्वी वाघनंख आणण्याबाबत करार करण्यासाठी लंडनला गेले होते.

मुनगंटीवार लंडनला (London) गेले मात्र वाघनखं न घेताच परतले. त्यामुळे राजकारणात चर्चांना नवा विषय मिळाला. दरम्यान यावर बोलत असताना आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मुनगंटीवार यांच्यावर टीका केली. बच्चू कडू म्हणाले, “की सुधीरभाऊ वाघनंख आणायला लंडनला गेले होते त्यांनी वाघनंख आणलीच नाहीत आता त्यांना खाजवायलाही नंख राहिली नाहीत.”

करार करण्यासाठी लंडनला जाण्याची गरज नव्हती. हे काम ऑनलाईनही झालं असतं. लंडन दौऱ्यासाठी 50 ते 60 लाखांचा खर्च करण्याची गरज नव्हती, असं देखील बच्चू कडू म्हणाले. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिलीये.

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

बच्चू कडू यांनी असं उपाहासात्मक बोलण्याची आवश्यकता नव्हती. उद्या ते आमदारकीच्या निवडणुकाही घेऊ नका, असं म्हणतील. कारण आमदारकीच्या निवडणुकांसाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात. एका लोकसभेच्या निवडणुकीला 25 कोटींचा खर्च होतो. त्यामुळे 20 वर्षांतून एकदा निवडणुका घ्या, अशी सूचना त्यांनी केली नाही, हे बरं झालं.

थोडक्यात बातम्या-