‘एकतर माझी अंत्ययात्रा निघेल नाही तर…’; मनोज जरांगे पाटील आक्रमक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

जालना | मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जिवाचं राण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जालना येथे अंतरवली सराटीमध्ये सभा आयोजित केली होती. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस-पवार (Shinde-Fadnavis-Pawar) यांच्यावर निशाणा साधत मराठा बांधवाना आवाहन केलं.

जरांगे पाटलांनी काय आवहान केलं?

अंतरवाली सराटी येथे आंदोलक मनोज जरांगे पाटील शिंदे- फडणवीस-पवार सरकार यांच्यावर निशाणा साधला. हे सरकार मराठा समाजाला उचकवण्याचं काम करत आहे, म्हणजे आपण जाळपोळ, लाठीजार्च करु आणि त्यानंतर मग या मुद्दयाला धरुन आपल्याला आरक्षाण मिळणार नाही, असं ते म्हणालेत.

माझी मराठा बांधवाना विनंती आहे की, कृपया जाळपोळ, उद्रेक करु नका. शांतेत आंदोलन करा, असं आवाहन मनोज जरांगे पाटालांनी केलं आहे. पुढे ते म्हणाले, की जर 23 ऑक्टोबरच्या आत जर मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर मी टोकाचं पाऊल उचलेलं. एकतर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मग मराठा समाजाची विजयी यात्रा.

थोडक्यात बातम्या-