‘राजा जेव्हा सत्तेसाठी भुकेला असतो तेव्हा…’; प्रकाश राज यांची मोदींवर टीका

नवी दिल्ली | भारतातील उपामारीवरून अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका केली आहे. Global Hunger Index 2023 मध्ये भारताचं स्थान हे 125 देशांच्या यादीत 111 वं आहे. यावरून प्रकाश राज यांनी गरिबी, बेकारी, उपासमार यावरून मोदींवर टीका केली आहे.

प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जेवण करताना एक फोटो पोस्ट केला आहे. त्याला राजा जेव्हा सत्तेसाठी भुकेला असतो तेव्हा.., असं कॅप्शन दिलं आ तसंच सिटिझन हंगर इंडेक्स असंही लिहिलं आहे. अभिनेते प्रकाश राज यांनी मोदींवर याआधीही टीका केली आहे. त्यापाठोपाठ आता ही पोस्टही समोर आली आहे.

या ट्विटमुळे आता पुन्हा प्रकाश राज हे चर्चेत आले आहेत. त्याचं हे ट्विट व्हायरल झालं असून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

नरेंद्र मोदींवर टीका करण्याची त्यांची ही पहिलच वेळ नाही. प्रकाश राज यांनी मोदींवर याआधीही टीका केली आहे. काही दिवसांपुर्वी त्यांचे चांद्रयान 3 वर केलेलं वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात आले होते. त्यानंतर संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या मोदींच्या फोटोवरही त्यांनी टीका केली होती.

महत्त्वाच्या बातम्या