मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख (Mahebub Shaikh) यांनी केलेल्या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. तसेच यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.
ताई….स्वत: साळसूदपणाचा आव आणत कुणा बाबूमिया बलात्काऱ्याला तुम्ही लिहिलेल्या स्क्रीप्टचं वाचन करायला लावलं…. मला तुम्हाला आणि तुमच्या चेल्याचपाट्यांना सांगायचंय मी काय आहे आणि माझं कॅरेक्टर काय आहे हे आदरणीय साहेबांना विचारा बोली भाषेत म्हणायचं तर तुमच्या बापाला जाऊन विचारा, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केलीये.
लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको, चारित्र्याबद्दल बोलूच नको, अशा शब्दात मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली होती. त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत चित्रा वाघ यांचा जोरदार समाचार घेतला होता.
दरम्यान, सध्या एक लाचखोर नवऱ्याची बायको जिला प्रसिद्धी हवी असते, ती गेल्या दोन दिवसापासून प्रसिद्धीसाठी सुप्रिया सुळेंवर टीका करत आहे. तिला बोललं की तिला महिला आणि बाईपण आठवतं. खरंतर तिचं तोंड उघडलं, भाषा ऐकली की महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला तिची भाषा माहिती आहे. तिची भाषा ही महिला आणि बाईपणाला शोभणारी आहे का, हिचं तोंड उघडलं की गटारगंगा तोंडातून बाहेर निघते, असं म्हणत मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांना सुनावलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-