“मंत्रालय राज ठाकरेंच्या घरून चालतं का?”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी टोलनाका याविषयावरून महत्त्वाची बैठक पार पाडली. गेल्या काही दिवसांपासून मनसे कार्यकर्त्यांनी टोल दरवाढी रद्द करण्यासाठी मुंबई येथे आंनदोलन केलं होतं. दरम्यान आज पार पडलेल्या बैठकीत याचा निर्णय झाला आणि राज ठाकरे यांच्या प्रयत्नांना यश मिळालं.

राज ठाकरे यांच्या निवास्थनी पार पडलेल्या बैठकीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सुद्धा उपस्थित होते. दरम्यान यावेळी माजी कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) विजय वड्डेटिवार (Vijay Waddetiwar) यांनी एकनाथ शिंदे तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला.

आपल्या राज्यात टोलचा मोठा झोल सुरू आहे. उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही टोल घेत नाही, टोल नाका वाले पैसे घेतल्याशिवाय गाडी सोडत नाही…. हे सगळं काय सुरू आहे हे जनतेला सगळं कळतंय, असं विजय वडेट्टीवार म्हणालेत. पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज ठाकरे यांच्या घरी बैठक घेण्यासाठी जातात. तो ही टोलचा विषय सोडवायला. मंत्रालय तिथून चालत का?, असा खोचक सवाल देखील त्यांनी केला.

बैठकीत टोलनाक्याविषयी काही महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका महिन्यात निर्णय घेतला जाणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे हे टोलनाके बंद होतील अशी आशा आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-