शरद पवारांचं नाव घेऊन गौतमी पाटील म्हणाली…

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे अकोल्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी एका सभेला संबोधित केलं. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये शरद पवारांनी गौतमी पाटीलचं नाव घेत शाळेच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमावर नाराजी व्यक्त केली होती.

शरद पवार यांनी शाळेच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमावर नाराजी व्यक्त केल्याने त्यावर गौतमी पाटील काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. आता यावर गौतमीने प्रतिक्रिया दिली आहे.

गौतमी पाटील हिचा पनवेलमधील वांवजे येथे अंकित वर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गौतमीला माध्यमांनी पवारांच्या नाराजीवरून प्रश्न विचारले. यावर गौतमीने थेट उत्तर देणं टाळलं. गौतमीने शरद पवारांविषयी बोलण्यास नकार दिला. शरद पवार यांच्याबद्दल काहीच बोलणार नाही, असं गौतमी म्हणाली.

 मागच्यावेळी मुंबईतील तिच्या कार्यक्रमात युवकांनी गोंधळ घातला होता. खुर्च्या फेकल्या होत्या. त्यावरही तिने भाष्य केलं. शांततेत कार्यक्रम पार पडावा असं आवाहन मी सदैव करत असते. पण ज्यांना गडबड करायची त्यांनी माझ्या कार्यक्रमाला येऊ नये, असं ती म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या-