शरद पवार गटातील ‘हा’ बडा नेता अजित पवार गटात जाणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | राष्ट्रवादीमध्ये (NCP) फुट पडल्यानंतर राजकारणाचं सगळं चक्रच बदललं आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीतील अनेक नेते त्यांच्यासोबत गेले. त्यामध्ये शरद पवार यांच्या जवळच्या आणि विश्वासू लोकांचा समावेश आहे. मात्र आता शरद पवार गटातील जवळचा नेता अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अजित पवार गटात सामील होतील, असा दावा करण्यात आला आहे. जयंत पाटील हे आमचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्यापैकीच काहीजण आमच्याकडे लवकरच येतील. जयंत पाटीलही आमच्याकडे येतील, अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे, असं मंत्री धर्मरावबाबा आत्रम यांनी म्हटलं आहे.

धर्मरावबाबा आत्राम यांनी सुनवणीवर सुद्धा वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, की आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आहेत. अजित पवार यांच्यासोबत आमदारांचं संख्याबळ आहे शिवाय जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे आम्हाला चिन्ह मिळायला हरकत नाही. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत बोलत असताना, नवरात्रीच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळ आणि वरिष्ठ पातळीवर असलेल्या नेत्यांमध्ये काय चर्चा झाली माहिती नाही. पण अजितदादांनी शपथ घेतली. तेव्हा त्यांना आशीर्वाद असणारच, असंही त्यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

नाना पटोलेंसमोर मोठा राडा, कार्यकर्त्यांनी एकमेकांचे कपडे फाडले

भाजपच्या सर्व नेत्यांचा पत्ता कट, संघाचा ‘हा’ माणूस पुण्यातून लोकसभा लढणार?

गौतमीचा धडा घ्यायचा का?, शरद पवार का संतापले???

अजित पवार मुख्यमंत्री होणार?, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

‘मोठ्ठ्या ताई तुमची चॉईसच वेगळीये’; चित्रा वाघ यांनी सांगितली सुप्रिया सुळेंची चॉईस