अकोला | गौतमी पाटील (Gautami Patil) आणि वाद हे समिकरणच झालंय. आता पुन्हा एकदा गौतमी चर्चेत आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) गौतमीचं नाव घेत बघा पोरांना काय शिकवायचं, असा सवाल केला आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील एका शाळेत गणेशोत्सवानिमित्त नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावरून शरद पवारांनी (Sharad Pawar) संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
नगर परिषदेच्या, जिल्हा परिषदेच्या शाळा खासगी कंपनीला दत्तक म्हणून दिल्या जात आहेत. नाशिकमधील एक शाळा दारू करणाऱ्या कारखान्याला सरकारने दत्तक म्हणून दिली. गेल्या महिन्यात त्या शाळेत गौतमी पाटीलचा डान्स ठेवण्यात आला. आता तुम्हीच बघा पोरांना काय शिकवायचं, असा सवाल शरद पवारांनी (Sharad Pawar) केला आहे.
आपण नव्या पिढीवर काय संस्कार करतो? कशासाठी खासगीकरण करतोय? याचं भान राज्यकर्त्यांना राहिलं नाही. भाऊराव पाटील आणि पंजाबराव देशमुखांनी शैक्षणिक संस्था निर्माण करून एक वेगळं चित्र निर्माण केलं. आणि आज गौतमी पाटील हिला नृत्यासाठी बोलावणारे आणि शाळा चालवणारे कुठे? याचा विचार केला पाहिजे, असा हल्ला शरद पवार यांनी सरकारवर चढवला आहे.
आपण काय करतोय?, कोणत्या पद्धतीने करतोय या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असं सांगत शरद पवारांनी सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाबाबत प्रश्न उपस्थित केले.
महत्त्वाच्या बातम्या-
- अजित पवार मुख्यमंत्री होणार?, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य
- ‘मोठ्ठ्या ताई तुमची चॉईसच वेगळीये’; चित्रा वाघ यांनी सांगितली सुप्रिया सुळेंची चॉईस
- ‘त्या’ डायरीमध्ये काय लिहिलं?; सुप्रिया सुळेंचा खुलासा
- पुन्हा तेच घडलं…; गौतमी पाटीलला मोठा धक्का
- “शरद पवारांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी अजितदादा भाजपसोबत गेले”