‘त्या’ डायरीमध्ये काय लिहिलं?; सुप्रिया सुळेंचा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माध्यमांशी बोलत असताना राष्ट्रवादीचे (National Congress Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत धक्कादायक खुलासे केले. या वेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत अनेक गौप्यस्फोट केले. त्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली.

भुजबळांच्या गौप्यस्फोटानंतर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भुजबळांवर टीका करत पलटवार केला आहे. नुकतंच माध्यमांशी बोलत असताना सुप्रिया सुळे यांना भुजबळांबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी आपल्या पर्समधून काही कागद काढले. त्यावर काही मुद्दे होते. ते मुद्दे वाचून त्यांनी भुजबळांवर पलटवार केला. यावेळी त्यांनी त्यांच्या पर्सनल डायरीचाही उल्लेख केला. माझ्या डायरीमध्ये मी सगळं काही लिहून ठेवते, असं त्या म्हणाल्या.

नेमकं काय लिहिलं होतं डायरीत?

लहानपणापासून मी डायरी लिहिते. डायरी लिहिण्याची मला लहानपणापासूनची सवय आहे. दिवसभर ज्या गोष्टी होतात त्या मी डायरीत लिहिते. त्यामुळे मी कालच्या मुलाखतीतील प्रत्येक गोष्ट लिहून आणलीये. भुजबळ कोणत्या मिटींगबद्दल बोलले? त्यामागचे संदर्भ काय? या सर्व गोष्टी मी डायरीत पडताळून पाहिल्या, असं सुप्रिया सुळेंनी माध्यमांना सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

पुन्हा तेच घडलं…; गौतमी पाटीलला मोठा धक्का

“शरद पवारांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी अजितदादा भाजपसोबत गेले”

‘…तेव्हाच भाजपसोबत जायचं ठरलं होतं’; भुजबळांनी सगळंच सांगून टाकलं

‘आतातरी जनतेचे मुख्यमंत्री बेस्ट कामगारांना न्याय देणार का?’, मनसेचा प्रश्न

‘तुम्ही या आपण पुन्हा एकत्र लढू’; राजू शेट्टींची बच्चू कडूंना भावनिक साद