‘तुम्ही या आपण पुन्हा एकत्र लढू’; राजू शेट्टींची बच्चू कडूंना भावनिक साद

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

सोलापूर | बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी घरवापसी करून परत यावं. त्यांनी मैदानात उतरावं. 2017 ला आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून दिली आहे. तुम्ही या आपण पुन्हा एकत्रित लढूयात. आता सत्तेत काहीही उरलेलं नाही, अशी भावनिक साद स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju shetti) यांनी बच्चू कडूंना घातली आहे. 

जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. रोजगार हमी योजना सुरु करावी लागेल. विमा कंपन्या संरक्षित रक्कम देत नाहीत. त्यामुळे दुष्काळ जाहीर करायला हवा, असं राजू शेट्टींनी म्हटलंय.

बच्चू कडू यांची भाषा अशी बदलेल, असं मला कधीही वाटलं नव्हतं. 1 वर्षात खताचे भाव वाढ 22 टक्के होत असेल तर मोदींचे फोटो खताच्या दुकानासमोर का लावायचे?, असं राजू शेट्टी म्हणालेत.

दरम्यान, बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीकाही झाली. नंतर बच्चू कडू यांनीही मंत्रिपदावरून आपली नाराजी बोलून दाखवली. यानंतर आता बच्चू कडू यांना भावनिक साद घालण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-