पुण्यातील पीएसआयचं नशीब चमकलं; 49 रूपयांत जिंकले दीड कोटी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | कोणाचं नशीब कधी उजळेल काही सांगता येत नाही. पुण्यातील एका पीएसआय सोबत असंच काहीसं घडलंय. ते एका रात्रीतच करोडपती बनले आहेत. त्यांना ड्रीम 11 मध्ये तब्बल दीड कोटींचं बक्षीस मिळालं आहे. सोमनाथ झेंडे असं त्यांचं नाव आहे. सोमनाथ झेंडे (Somnath Zende) हे पिंपरी-चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत.

सोमनाथ यांनी गेल्या दोन तीन महिन्यांपासून ड्रीम 11 खेळण्यास सुरूवात केली होती. झेंडे यांनी निवडलेल्या टीमला रँकिंग मिळाले आणि तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस सागरला मिळाले आहे. या रकमेतील टीडीएस वजा करून जिंकलेली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

झेंडे यांना मिळालेल्या या यशामुळे कुटुंबात जल्लोष करण्यात आला. नीट अभ्यास करून खेळल्यामुळेच यश मिळालं आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल मित्रमंडळीकडून आणि नातेवाईकांकडून त्यांचं कौतुक केलं जात आहे.

दरम्यान, सध्या विश्वचषक सुरू असल्याने अनेक जण अॅप डाऊनलोड करून संघ तयार करून पैसे लावत असतात. मात्र हे करत असताना अनेकांची फसवणूक देखील होते. अनेकांना लाखोंचा गंडा घातला जातो. यामुळे तरूणांनी या फसवणुकीपासू लांब राहावं, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-