पोटच्या गोळ्यासाठी ती बिबट्याला जाऊन भिडली, शेवटी…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | आई (Mother) काहीही करू शकते हे वाक्य आपण बऱ्याचदा ऐकतो. त्यात जर विषय तिच्या लेकराला असेल तर ती कधीच मागे पुढे बघत नाही. याचाच प्रत्यय आंबेगावमध्ये आला आहे. पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी आई थेट बिबट्याला जाऊन भिडल्याची घटना समोर आली आहे.

बाळावर बिबट्याने हल्ला केल्यानंतर जीवाची पर्वा न करता आईने आपल्या बाळाला वाचवलं आहे. आंबेगाव येथील थोरांदळे येथे मेंढपाळाच्या कळपाजवळ खेळत असलेल्या चिमुकल्या मुलावर बिबट्याने हल्ला केला. यानंतर या आईने आवाज करत बिबट्याला पांगवलं. यानंतर बिबट्याने धूम ठोकली. या हल्ल्यात सात महिन्याचा चिमुकला जखमी झाला आहे.

गेलय काही दिवसापासून या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. शिवाय बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

दरम्यान,  या हल्ल्यात सात महिन्याचा मुलाला थोडी इजा झाली आहे. त्यानंतर मुलाला आणि आई सोनल यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर लस देण्यात आली आहे. सध्या मुलावर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय मंचर येथे उपचार सुरु आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-