‘…तर रस्त्यावर उतरा’; शरद पवारांचं महिलांना आवाहन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | समाजात चुकीचं काही दिसलं तर रस्त्यावर उतरा, सरकार केसेस टाकेल, पण तरीही घाबरु नका. सरकार बदलत असतं, आपण त्या केसेस मागे घेऊ, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) म्हटलंय. शरद पवारांनी (Sharad Pawar) मुंबईत महिलांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी महिलांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं.

आपण संरक्षण खात्यात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी अनेकांचा विरोध होता. मात्र मी स्वतः मंत्री म्हणून तो निर्णय घेतला आणि आता तुम्हाला महिला सैन्यात दिसत आहेत. ही जमेची एका बाजूला परिस्थितीत आहे, दुसरीकडे मणिपूरसारखी घटना समोर येते. त्यामुळं आपल्याला जागरुक राहावं लागणार आहे, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणालेत.

सरकारी नोकरीमुळे कुटुंबात स्वास्थ असतं. पण कंत्राटी पदावर नेमलं तर तिथ आरक्षण नाही. त्यामुळे तिथं संधी मिळणार नाही. आपल्याला आता रस्त्यावर उतरावं लागेल, असंही शरद पवार (Sharad Pawar) म्हणालेत.

दरम्यान, सावित्राबाई फुलेंनी विरोधात असताना देखील शाळा काढली होती पण आता शाळा बंद करणं हे योग्य नाही. असं होत असताना तुम्ही शांत बसत असाल तर हे चुकीचं आहे, असंही शरद पवार (Sharad Pawar) महिलांना मार्गदर्शन करताना म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-