मुंबई | अजित पवार (Ajit Pawar) यांना युती सरकारमध्ये सामील होऊन 100 दिवस पूर्ण झाले. या निमित्त महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक पत्र लिहिलं. या पत्रावर राष्ट्रवादीने टीका केलीये.
100 दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण ठेवला म्हणत राष्ट्रवादीकडून (Ncp) अजित पवार यांच्यावर टीकास्त्र डागण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर घणाघात करण्यात आलाय.
9 मुद्द्यांतून राष्ट्रवादीकडून अजित पवारांवर निशाणा साधण्यात आला आहे. पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन जगणारा कधीच दिल्लीच्या तख्तापुढे आपला महाराष्ट्र स्वाभिमान गहाण ठेवत नाही, असं राष्ट्रवादीने (Ncp) म्हटलंय.
जो तुम्ही गेले 100 दिवस गहाण ठेवलात… कितीही मोठं संकट आलं तरी, विचारांच्या तत्वांशी एकनिष्ठ राहून कुणापुढे न झुकता महाराष्ट्राच्या हिताचा ध्यास अहोरात्र बाळगण्याची धमक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांमध्येच आहे, असंही राष्ट्रवादीने म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या-