टोलवरुन ‘हे’ बडे नेते अडचणीत!, राज ठाकरेंनी थेट लावले व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मनसे (MNS) नेते टोलवरुन चांगलेच आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात टोलनाक्या विषयी वातावरण तापलं आहे. मुलुंड-ठाणे येथे मनसे कार्यकर्ते अविनाश जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अविनाश जाधव यांची भेट घेतली.

राज ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित केली. यावेळेस त्यांनी भाजप, (BJP) शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीच्या (National Congress Party) नेत्यांनी टोलबाबत काय विधानं केली होती, याचे व्हिडीओच दाखवले. व्हिडीओमध्ये गोपिनाथ मुंडेंपासून (Gopinath Munde) अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा समावेश होता.

या वेळी राज ठाकरे म्हणाले, की टोल हा सर्वात मोठा स्कॅम (Scam) आहे आणि लवकरात लवकर याची चौकशी केला पाहिजे. राज ठाकरे यांनी लावलेल्या त्या व्हिडीओमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “वर्षानुवर्षे महाराष्ट्रातील लोक टोल भरत आहेत. तो बंदच करावा लागेल.”

तर दुसकरीकडे अजित पवार म्हणाले की, STला सुद्धा टोल भरावा लागणार नाही असा निर्णय घेऊ. दरम्यान याविषयी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील “आम्ही महाराष्ट्र टोल मुक्त करणार” असं भाष्य केलं होतं. राज ठाकरे यांच्या या ‘लाव रे तो व्हिडीओ’मुळे आता टोलच्या मुद्द्यावरून सरकारमधील अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. 

थोडक्यात बातम्या-

अखेर प्रतीक्षा संपली!, सीमा हैदरनं दिली गोड बातमी…

निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, ‘या’ निवडणुकीच्या तारखा जाहीर

छगन भुजबळ यांची थेट शरद पवार यांच्याशी तुलना!

‘जे विठ्ठल बोलत होते ते…’ पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड अक्षरश: ढसाढसा रडले

मध्यरात्री 2 वाजता मनोज जरांगे पाटील यांनी घेतली सभा!