‘जे विठ्ठल बोलत होते ते…’ पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड अक्षरश: ढसाढसा रडले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मंबई | शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी कालच्या सुनावणीवर भूमिका मांडण्यासाठी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना अक्षरश: रडू कोसळलं. ते भर पत्रकार परिषदेत रडताना बघायला मिळाले.

जितेंद्र आव्हाडांना अश्रू अनावर झाले होते. अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निवडणूक आयोगात करण्यात आलेल्या युक्तिवादाने जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) व्यथित झाले आहेत.

घरात बसल्यानंतर तुम्हाला फोन येणार की तुम्हाला मंत्री केलंय, जा शपथविधी करा, त्यांच्या या सगळ्या भावनिक स्वातंत्र्याचं त्यांना काय फळ मिळालं? तर ते हुकूमशाह आहेत? मला महाराष्ट्रातील एका व्यक्तीने हे सांगावं की शरद पवार (Sharad Pawar) हुकूमशाह सारखे वागतात, असं आव्हाड (Sharad Pawar) म्हणालेत.

निवडणुक आयोगात माझ्या डोळ्यात अश्रू आले. शरद पवार हे संस्थानिकासारखे पक्ष चालवायचे, ते लोकशाही पद्धतीने वागले नाहीत. त्यांनी हुकूमशाह असं विधान केल्याने मी व्यथित झालो. कालपर्यंत जे विठ्ठल बोलत होते ते हुकुमशाह बोलू लागले, असं आव्हाडांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या-