छगन भुजबळ यांची थेट शरद पवार यांच्याशी तुलना!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नाशिक | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. या वेळी त्यांच्या सोबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) सुद्धा उपस्थित आहेत. राष्ट्रवादीने यावेळी कळवण येथे शेतकरी मेळावा आयोजित केला होता. दरम्यान कार्यक्रमात बोलत असताना भुजबळांनी स्वतःची तुलना थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत केली.

काय म्हणाले छगन भुजबळ?

भाषणावेळी छगन भुजबळ म्हणाले की, “शरद पवार (Sharad Pawar) सांगतात, की मी राष्ट्रवादी पक्षाचा संस्थापक अध्यक्ष आहे, मग पवार साहेब मला तुम्हाला विचारायचं आहे की, मी सुद्धा या महाराष्ट्राचा पहिला राष्ट्रवादीचा प्रांताध्यक्ष आहे, आमचाही पक्ष बांधणीत खारीचा वाटा आहे, असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.”

राष्ट्रवादीच्या चिन्हाबद्दल बोलत असताना “माझ्याच बंगल्यावर नाव आणि चिन्ह ठरलं होतं”, असंही छगन भुजबळ म्हटले. पुढे ते म्हणाले, “आम्ही का गेलो याचं कारण तुम्हाला आम्ही सांगितलं आणि तुमच्या जवळचे लोक सुद्धा तुम्हाला कायम सांगत असतात.”

थोडक्यात बातम्या-

‘जे विठ्ठल बोलत होते ते…’ पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड अक्षरश: ढसाढसा रडले

मध्यरात्री 2 वाजता मनोज जरांगे पाटील यांनी घेतली सभा!

“संजय राऊत ही राज्याला लागलेली कीड”

अजित पवारांच्या बॅनरवर यशवंतराव चव्हाणांचा फोटो; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मोठी बातमी! शरद पवार गटातील हा आमदार अजित पवारांना पाठिंबा देणार?