अजित पवारांच्या बॅनरवर यशवंतराव चव्हाणांचा फोटो; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नाशिक | राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अनेक बैैठकीमध्ये दादा गैरहजर होते. मात्र त्यांच्या नाराजीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांची तब्यत बरी नसल्याचं सांगितलं होतं.

नाराजीनंतर अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर गेले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केलं. यावेळेस त्यांनी बॅनरवर चक्क राष्ट्रवादी पक्षाचे आध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा फोटो न लावता महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (CM Yashwantrao Chavan) यांचा फोटो लावला.

नाशिक येथील अजितदादांच्या कार्यक्रमात सध्या बॅनरची जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर अजित पवारांचे अनेक कार्यक्रम पार पडले. यावेळी शरद पवार यांनी अजित पवार गटाला सांगितलं होतं की ‘माझा फोटो कुठेही वापरू नका. माझा नाव वापरू नका’

त्यानंतर आज नाशिकमध्ये बँनरवर शरद पवारांच्या फोटो ऐवजी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावला आहे. त्यामुळे सध्या नाशिक येथे बॅनर चर्चेचा विषय ठरतोय.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! शरद पवार गटातील हा आमदार अजित पवारांना पाठिंबा देणार?

शेतकऱ्यांनी अजित पवारांचा ताफा अडवला आणि…

“भाषणावर आमदार निवडून येत असते तर आज…”

शरद पवार गटाच्या वकिलांचा अत्यंत धक्कादायक दावा!

‘मोदी फक्त हरामाचं खात आहेत’; प्रणिती शिंदेंची मोदींवर टीका