मुंबई | काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) एक पोस्टर पोस्ट केलं होतं. आता त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने राहुल गांधींचं रावणाच्रूयापातील एक पोस्टर पोस्ट केलंय. त्या पोस्टरला ‘भारत संकटात आहे’ असे हेडिंग देण्यात आलं.
भाजपने शेअर केलेल्या या पोस्टरमुळे आता काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. आता यावरून काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका केली आहे.
भाजपने राहुल गांधींचा रावण असा उल्लेख केल्याने प्रणिती शिंदे भडकल्या. मोदींचा आत्मविश्वास कमी होताना दिसत आहे. रावणाची काही ठिकाणी पूजा करतात. पण कुंभकर्णाचं काय? जो झोपेचं सोंग घेतो. मोदी सध्या तेच करत आहेत, अशी टीका प्रणिती शिंदेंनी (Praniti Shinde) केली आहे.
मोदी ज्वलंत विषयावर कधीच बोलत नाही. ते मौन बाळगतात. मोदी फक्त हरामाचं खात आहेत. त्यामुळे लोकांना कळून चुकलंय की खरा रावण कोण आहे ते, अशी टीका प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-