मराठा समाजाच्या मनोज जरांगे पाटलांविरोधात पोलीस तक्रार!

मुंबई | मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर रान करणारे मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) सध्या संवाद यात्रा करत आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी केलेल्या टीकेवरुन छगन भुजबळ यांचे समर्थक पोलीस स्टेशनमध्ये पोहचले आहेत.

मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये मराठा आरक्षणावरुन शाब्दिक वाद सुरु झाला आहे. जरांगे पाटलांच्या कार्यक्रमात भुजबळांवर टीका होताना दिसते. एका कार्यक्रमात तर जरांगे पाटील यांनी “भुजबळ आम्हाला डिवचू नका”, असं म्हणत इशारा देखील दिला होता. मात्र आता पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी छगन भुजबळ यांना डिवचल्याने भुजबळांच्या कट्टर समर्थकांनी थेट पोलीस स्टेश्न गाठलं आहे.

समता परिषदेनं मनोज जरांगे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करा, अशी मागणी छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. जरांगेंवर गुन्हा दाखल करुन त्यांच्या सभेवर बंदी घाला, अशी मागणी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या संवाद यात्रेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती. छगन भुजबळ यांना बळ देऊ नका, असं ते म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या-

शरद पवारांचा मोठा डाव; अजित पवारांसह त्यांचे आमदार अडचणीत?

“अंधारेबाई संबंध नसताना नातवाला राजकारणात ओढाल तर…”

“…आता त्यांच्याच उरावर अजित पवार बसलेत”

‘गुवाहटी, गोव्याला जाऊन मौजमजा करण्यासाठी पैसे आहेत पण…’; उद्धव ठाकरे संतापले

“महाराष्ट्रात यमाचा रेडा फिरतोय, त्यावर मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्री बसलेत”