“…आता त्यांच्याच उरावर अजित पवार बसलेत”

मुंबई | नांदेड, संभाजीनगर आणि नागपूरमधील रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं आहे. यावरून आता उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सरकारवर टीकास्त्र सोडलंय. तसेच यावेळी बोलताना त्यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) नाराजीवर देखील भाष्य केलं आहे.

माझ्याकडे असताना अजितदादा कधी नाराज नव्हते. अजित दादांमुळे जे नाराज व्हायचे त्यांच्या उरावर जाऊन दादा बसले आहेत. राज्यातील जनतेला विश्वास देणारं कोणी नाही. सरकारकडे जाहीरातीसाठी पैसे आहेत. नांदेडच्या रुग्णालयात टास्क फोर्स घेऊन भेट का दिली जात नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सरकारवर निशाणा साधला आहे.

गुजरात, गुवाहाटीमध्ये जावून खर्च करायला सरकारकडे पैसै आहेत. गोव्यात जावून टेबलवर नाचायला त्यांच्याकडे पैसे आहेत. पण महाराष्ट्रातील रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केली आहे.

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नांदेडला जायला हवं होतं. राज्यातील सरकारमध्ये दलाल बसले आहेत. सध्या जी साथ आहे ती भ्रष्टाचाराची साथ आहे. कोणाचे दलाल बसले आहेत का याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .