सिंधुदुर्ग | केंद्रीय मंत्री नारायण राणे(Union Minister Narayan Rane) कायम विरोधी पक्षांच्या नेत्यांवर टीका करताना दिसत असतात. राणे यांनी नुकतीच शिवसेना नेते उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यावर एकेरी उल्लेख करत सडकून टीका केली. सध्या नारायण राणे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत.
काय म्हणाले नारायण राणे?
सिंधुदुर्ग येथे पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ठाकरे ज्या अर्थी सरकारला प्रश्न विचारतात, त्या अर्थी अडीच वर्षाच्या काळात त्यांनी काय काम केलं? ठाकरे यांचं नाव घेतल्यावर मला जेवण जात नाही, असं राणे म्हणाले. किती पर कॅपिटल उत्पन्न वाढवले? जीडीपी किती वाढवली? रोजगार निर्मिती किती केली? गरिबीचे प्रमाण किती कमी केले? कुपोषितपणा किती कमी केला? असे अनेक प्रश्न त्यांनी केले.
नारायण राणे म्हणाले, की उद्धव ठाकरे यांना असले प्रश्न समजणार पण नाहीत. ठाकरेंना काही माहित नाही, त्यांना फक्त खोके आणि ठोके एवढंच माहित आहे. नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव साततत्यानं ठाकरेंवर खोचक टीका करत असताना दिसतात. मात्र आता, ठाकरे गटातील नेते नारायण राणे यांच्यावर पलटवार करण्याची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या-
इंडिया आघाडीमध्ये आता ‘हा’ बडा नेता सामील होणार?
खलिस्तान्यांकडून तिरंग्याचा अपमान मात्र… पुणेकराचं कृत्य पाहून तुम्हाला वाटेल अभिमान
“भाजप मित्र म्हणून जवळ घेतो आणि…”
“या माणसाने देशाचं वाटोळं केलं, टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही”