मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा दिल्लीत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कोणाचा कोणाला ताळमेळ लागेना. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात अनेक हालचाली होताना पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांचा दोन दिवसांपूर्वीच दिल्ली दौरा पार पडला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागचं कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कामानिमित्त भेट घेतली असं सांगितलं. दरम्यान आता मुख्यमंत्री पुन्हा एकदा दिल्लीला गेल्याचं समोर आलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा दिल्लीत रवाना

माध्यमांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन दिवसांपूर्वी दिल्लीला(Delhi) रवाना झाले होते. मात्र त्यानंतर आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री दिल्लीला गेल्याने सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली. अमित शहा(Amit Shaha) यांनी उद्या बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहेत.

तर दुसरीकडे अजित पवार(Ajit Pawar) नाराज असल्याच्या चर्चा होत्या. राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीत अजित पवार उपस्थित राहिले नाहीत. अजित पवार यांची तब्येत बरी नसल्याने ते या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

“संजय राऊत खोटारडा, घर चालवण्यासाठी शिंदे साहेबांकडून पैसे घ्यायचा”

“अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील”

अदानींबाबत शरद पवार यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

सरकारचा मोठा निर्णय; 600 रुपयांत गॅस सिलेंडर मिळणार

आता ‘या’ जिल्ह्यातही गौतमी पाटीलला नो एन्ट्री!