अदानींबाबत शरद पवार यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | अदानींबाबत मतं मांडण्यासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) स्वतंत्र आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. पण जेव्हा देशाच्या विकासाचा मुद्दा येतो तेव्हा मी अदानी यांचंच समर्थन करेन, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावर टीका करत आहेत. संसद असो की संसदेच्या बाहेर राहुल गांधी हे अदानींविरोधात सातत्याने बोलत असतात. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सातत्याने गौतम अदानी यांना भेटत असतात. यावरून सतत चर्चा होत असते. आता खुद्द शरद पवार यांनी याबाबत मोठा खुलासा केलाय.

भाजपला देशातील वातावरण अनुकूल नसल्याचंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. त्यासाठी त्यांनी मे महिन्यात कर्नाटकात झालेल्या निवडणुकीचा संदर्भ दिला. राज्यांमध्ये भाजपला अनुकूल वातावरण नाहीये. महाराष्ट्राचा विचार कराल तर आता निवडणुका झाल्यास राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचं सरकार येईल, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, अजित पवार हे भाजपच्या सरकारमध्ये गेल्याने पक्षात फूट पडली आहे. पण त्याचा कुटुंबावर काहीच परिणाम झालेला नाही. आमचे खासगी आणि व्यावसायिक संबंध वेगवेगळे आहेत, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .