दिल्लीत मोठी घडामोड; राज्यातील 20 आमदार राष्ट्रपतींच्या भेटीला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात दिवसेंदिवस काही न काही उलथापालथ होताना दिसत आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) 3 ओक्टबर रोजी दिल्लीला (Delhi) रावाना झाले. त्यामुळे राजकारणात चर्चांना उधाण आलं.

शिंदे-फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामागचं नेमकं कारण काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shaha) यांची भेट घेतली. या वेळेस राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांची नाराजी आणि मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा झाली. हे सुरु असताना दुसरीकडे सर्वपक्षीय 20 आमदारांनी राष्ट्रपतींची(President) भेट घेतली त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

भेटी मागचं नेमकं कारण काय?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू(Draupadi Murmu) यांना भेटण्यासाठी राज्यातील 20 आमदार सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवनात गेले. मात्र या भेटीमागचं नेमकं कारण काय? हे अजून स्पष्ट झालं नाही. दरम्यान 4 वाजता पत्रकार परिषद होणार असून त्यावेळेस हे 20 आमदार या मागचं कारण सांगणार असल्याचं माध्यमांकडून समजलं.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! खासदार हेमंत पाटील अडचणीत

राष्ट्रवादीचा माजी खासदार ठाकरे गटाचा उमेदवार?

“सत्ताधारी गटातील एकही आमदार दारात उभा करण्याच्या लायकीचा नाही”

सर्वात मोठी बातमी, महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती

नांदेडमधील घटना गांभीर्याने घेतली, चौकशी करून कारवाई करणार- एकनाथ शिंदे