नांदेड | नांदेडच्या डॉ.शंकरराव’ चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एकाच दिवशी 24 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 12 बालकांचा देखील समावेश होता. ही घटना समोर येताच राज्यभरासह देशभरात खळबळ उडाली होती. विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या दुरावस्थेवरुन राज्य सरकारला प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे.
रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूनंतर शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता पाहून संतापलेल्या हेमंत पाटलांनी थेट रुग्णालयाच्या डीनलाच स्वच्छतागृह साफ करायला लावले. हे प्रकरण हेमंत पाटलांना भोवलं असून त्यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर विरोधकांनी टीका करत थेट राजीनाम्याची मागणी केली होती.
अखेर खासदार हेमंत पाटलांवर नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतः डीन डॉ. एस. आर. वाकोडे यांनी तक्रार दाखल केली.
खासदार हेमंत पाटील यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागावी, अन्यथा डाॅक्टर्स महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सोबतच राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडल्यास सरकार जबाबदार राहणार, अशी भूमिका सेंट्र्ल मार्डनं घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-