मुंबई | महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या आहेत. सध्याचे राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार असताना रश्मी शुक्वला या राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त होत्या. त्यावेळी त्यांनी राजकीय नेत्यांचे अवैधरित्या फोन टॅप करुन देवेंद्र फडणवीस यांना माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सेठ हे येत्या डिसेंबरमध्ये रिटायर होणार होते. त्याआधी त्यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र पोलीस संचालकपदी नियुक्ती करण्यात आलीय.
महत्त्वाच्या बातम्या-