“एकनाथ शिंदे, थोडी जरी लाज शिल्लक असेल तर राजीनामा द्या”

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊतांनी(Sanjay Raut) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांना राजीनामा देण्यासाठी मागणी केली आहे. नांदेड येथील शासकीय रुग्णालयात गेल्या 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आणि या मुद्द्याला धरुन संजय राऊत आक्रमक झाले आहेत.

नांदेड(Nanded) येथील शासकीय रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये दीड ते तीन दिवसाच्या बालकाचा सुद्धा समावेश असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यात शिंदे-फडणवीस(Shinde-Fadnavis) सरकारवर जोरदार टीका सुरु आहे. दरम्यान आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री तसेच आरोग्यमंत्री यांच्यावर टीका करत त्यांना राजीनामा देण्यासाठी मागणी केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

नांदेड येथे घडलेल्या प्रकारावरुन थोडी जरी लाज शिल्लक असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आणि आरोग्यमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. घडलेल्या प्रकारावरुन आरोग्यमंत्र्यांना याबाबत बिलकुल इंटरेस्ट नसल्याचं स्पष्टपणे दिसून येतंय. ते सध्या वेगळ्याच कामात अडकलेले असतात. निष्पाप लोकांचे जीव जात आहेत आणि सरकारला यांचं गांभीर्य काहीच वाटत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकवर असलेल्या नांदेडच्या शासकीय रुग्णालयावर रूग्णांच्या नातेवईकांनी काही आरोप केले आहेत. दिलेल्या माहितीनुसार औषधाच्या तुटवड्यामुळे या रुग्णांना आपला प्राण गमवावा लागल्याचं सांगण्यात आलं आहे. या शिवाय रुग्णालयात सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि रक्त तपासणी सुविधा नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या –

“मोदी-शहा आले तसे जातील, त्यांचं नामोनिशाणही इतिहासात राहणार नाही”

“तीन इंजिनं लागूनही राज्याचं आरोग्य व्हेंटिलेटरवर असेल तर काय उपयोग?”

‘GST चे 19 कोटी लोकवर्गणीतून जमा करून थोबाडावर मारू…’; मुंडे समर्थक लागले कामाला

‘फक्त सहा महिने…’; ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

“संजय राऊतांसारख्या ढेकणाला मारण्यासाठी सैन्याची गरज नाही ते…”