‘फक्त सहा महिने…’; ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाला आव्हान देत एकनाथ (Eknath Shinde) शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड करत भाजपसोबत (Bjp) सरकार स्थापन केलं. त्यानंतर अजित पवार देखील सत्तेत सामिल झाले. राष्ट्रवादीच्या सत्तेतील एन्ट्रीमुळे हे सरकार आणखी भक्कम झालं. मात्र ठाकरे गटाकडून वारंवार हे सरकार पडणार असल्याचं वक्तव्य केलं जातं.

ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काही दिवसांमध्ये काहीतरी मोठं होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

फक्त सहा महिने उरलेत. सहा महिन्यांनी हा भास्कर जाधव या भागात, जिल्ह्यात आणि राज्यात स्वाभिमानानं आणि सन्मानानं मंत्री म्हणून फिरेन, असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय.

भास्कर जाधव यांनी या कार्यक्रमात मुंबई महापालिकेतील सर्व्हेवरूनहीदेखील भाजपसह शिंदे गटाला फटकारलं. ते म्हणाले, शिवसेना फोडल्यानंतर भाजपनं सहा ते सात सर्व्हे केले. त्या सगळ्या सर्व्हेत मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंचे सगळे नगरसेवक निवडून येतील, असा कौल समोर आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-