महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; ‘या’ नेत्याला खुली ऑफर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची आज पत्रकार परिषद पार पडली. या वेळेस त्यांनी शिवसेना आणि वंचित या युती बद्दल एक विधान केलं ज्याची सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे. गेल्या वर्षी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची(UBT) युती झाली होती.

माध्यमांशी बोलत असताना प्रकाश आंबेडकरांनी शिवसेना (Shivsena) आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) या बद्दल वक्तव्य केलं. ते म्हणाले की, “शिवसेनेसोबत आमची बोलणी झाली आहे, पण लग्नाची तारीख अजून निघायची बाकी आहे. या मागचं कारण म्हणजे यामध्ये दोन भटजी आडवे आले आहेत. एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (Congress Party) आणि दुसरे म्हणजे एनसीपी (National Congress Party).”

अद्यापही या दोन्ही पक्षांनी जागा वाटपासाठी चर्चा केलेली नाहीये. शिवाय शिवसेनेसोबत त्यांनी बोलणी देखील केलेली नाही. सध्या लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणूका जवळ आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्ष एकत्र आले. त्यांनी इंडिया (India) आघाडीची स्थापना केली आहे. मात्र यामध्ये प्रकाश आंबेडकरांना कुुठेही आमंत्रित केलेलं नाहीये. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

इंडिया आघाडी विषयी बोलत असताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, की येणाऱ्या काळात नेमक्या काय घडामोडी घडणार आहेत हे पाहणं म्हत्त्वाचं ठरेल. दरम्यान प्रकाश आंबेडकरांना एक ऑफर सुद्धा देण्यात आली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांनी, प्रकाश आंबेडकर अमच्याकडे आले तर आम्ही त्यांचं स्वागतच करू असं म्हणत त्यांना ऑफर दिली आहे. त्यामुळे चर्चांना एकच उधाण आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘मराठ्यांना डिवचल्यावर…’; मनोज जरांगे पाटलांचा थेट छगन भुजबळांना इशारा

16 आमदारांच्या अपात्रतेबाबत कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य

“यंदा आर्मी बोलवा, आम्हाला चिरडून टाका पण…”; संजय राऊतांचं शिंदेंना आव्हान

“…म्हणून गांधीजींसारखं दुसरं कुणी होणे नाही”

‘लिपस्टिक आणि बॉबकटवाल्या महिलाच…’; ‘या’ नेत्याची जिभ घसरली