‘मराठ्यांना डिवचल्यावर…’; मनोज जरांगे पाटलांचा थेट छगन भुजबळांना इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

जालना | मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालन्यात आंदोलन करणारे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना इशारा दिला आहे.

राज्यातील ओबीसी नेते जे आता मराठा आरक्षणाला विरोध करतायत, त्यांना मराठा समाजाने आतापर्यंत खूप काही दिलं आहे. तुम्ही कधीतरी मराठ्यांच्या कामी याल म्हणून मराठ्यांनी छगन भुजबळांना मदत केली. आता आम्ही आरक्षण घ्यायची वेळ आली तर आम्हाला म्हणतात की 50 टक्क्यांच्या आत आरक्षण घेऊ देणार नाही. पण आम्ही 50 टक्क्यांच्या आतच आरक्षण घेऊ, असं जरांगे पाटील म्हणालेत.

माझं उपोषण सुटल्यापासून मी कधीच कोणावर ती व्यक्ती बोलण्याआधी बोललो नाही. आधी भुजबळ बोलले मग मी त्यावर माझं मत मांडलं. आम्ही काय गप्प बसणार का? आम्हाला डिवचल्यावर आम्ही गप्प बसणार नाही, असं जरांगे पाटील म्हणालेत.

तुम्ही मराठ्यांना का डिवचता? तुम्ही डिवचलं म्हणून आम्ही टीका केली. ते मराठा आरक्षणाविरोधात बोलले की सामान्य मराठा तुटून पडतो, असं जरांगे पाटील म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-