“…म्हणून गांधीजींसारखं दुसरं कुणी होणे नाही”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | गांधी जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर रोजी देशभरात वेगवेगळ्या प्रकारे देशवासीय महात्मा गांधींना (Mahatma Gandhi) अभिवादन करतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही (Raj Thackeray) सोशल मीडियावर महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त खास संदेश पोस्ट केला आहे.

आज महात्मा गांधीजींची जयंती. व्यक्तिगत ते सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेसाठीचा आग्रह, स्वच्छ, निर्मळ मन आणि अर्थात स्वच्छ हेतू याच्या सहाय्याने त्यांनी हिंदुस्थानाला स्वातंत्र्याची दिशा नाही दाखवली तर जगाला अनेक शतकं प्रेरणा दिली, असं राज ठाकरे म्हणालेत.

जगातील लोकप्रिय नेते गांधीजी होते का किंवा आहेत का? असतीलही किंवा नसतीलही. पण आज देखील त्यांचं अनुकरण करावं असं जगातील लाखो करोडो लोकांना वाटतं, इतकं संचित मागे ठेवून गेलेल्या ह्या महापुरुषाच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन, असं राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांनी दिल्लीत राजघाट येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन केलं. काही मान्यवरांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. 

मनसे रिपोर्टनंही राज ठाकरेंच्या भूमिकेसंदर्भातली एक पोस्ट शेअर केलीये. शृंखला, मग त्या अज्ञानाच्या असोत की गुलामगिरीच्या, वसाहतवादाच्या की जातींच्या, त्या शृंखलांनी कुठल्याही माणसाला बांधून ठेवण्याचा अधिकार कुणालाच नाही. कारण सगळी माणसं ही मुळात समान आहेत, इतकं सोपं तत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्यासाठी त्यांनी संघर्ष केला. हे खूप कठीण आणि दुर्मिळ आहे. म्हणूनच गांधीजींसारखं बहुदा दुसरं कुणी होणे नाही, असंही सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-