‘लिपस्टिक आणि बॉबकटवाल्या महिलाच…’; ‘या’ नेत्याची जिभ घसरली

पाटणा | महिला अरक्षणाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी मंजूरी दिली असली तरी मात्र यावर अनेकजणांचा अक्षेप आहे. शिवाय या मुद्द्यावरून वाद देखील झाले. याच आरक्षणाला धरुन लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे बडे नेते व बिहारची माजी मंत्री अब्दुल बारी सिद्दीकी यांनी असं वक्तव्य केलं ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय.

अब्दुल बारी सिद्दीकी यांनी केलं वादग्रस्त वक्तव्य

मुझफ्फरपूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात अब्दुल बारी सिद्दीकी (Abdul Bari Sidiqui) बोलत असताना त्यांची जीभ घसरली. महिला आरक्षणात (Women’s Reservation) मागास आणि अति मागासांचाही कोटा ठरवला पाहिजे. महिलांना मिळालेल्या आरक्षणात जर मागासांनाही जागा राखीव ठेवल्या तर या आरक्षणाला काही तरी अर्थ आहे. नाही तर फक्त महिला असल्याच्या नावाने पावडर, लिपस्टिक आणि बॉबकटवाल्या महिलाच संसदेत पोहोचतील.

मिळालेल्या महिला आरक्षणात इतर जातींच्या महिलांसुद्धा सामील करून घ्यावं. पुढे ते म्हणाले की लिपस्टिक आणि बॉबकटवाल्या महिलाच संसदेत पोहोचल्या तर नोकऱ्यांमध्येही इतर महिलांचे अधिकार त्या हिरावून घेतील. आरक्षणात कोट्यामध्ये सुद्धा कोटा मिळाला पाहिजे. अब्दुल बारी सिद्दीकी यांनी केलेल्या वक्तव्यावर आरजेडीचे प्रवक्ते मृत्यूंजय तिवारी यांनी सप्षटीकरण दिलं आहे.

मृत्यूंजय तिवारी म्हणाले की बॉबकट आणि लिपस्टिकच्या वक्तव्याचं आरजेडीनं समर्थन केलं असलं तरी त्यात गैर काही नाही. रुपकाच्या माध्यमातून सिद्दीकी यांनी आपलं मत मांडलं.

थोडक्यात बातम्या-

राष्ट्रवादीच्या नेत्याच्या नातवाचा अपघात; जागेवरच झाला मृत्यू

शरद पवारांची नवी खेळी?; अजित पवार अडचणीत येणार?

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा मोठा प्लॅन!

गौतमी पाटीलविरोधात गुन्हा दाखल, नेमकं झालंय काय?

“…तर कॉन्ट्रॅक्टरला बुलडोझर खाली टाकीन”

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .