“…तर कॉन्ट्रॅक्टरला बुलडोझर खाली टाकीन”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

वाशिम | मी प्रेशर आणून ठेकेदाराकडून काम करून घेतो. मात्र तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला त्रास देऊ नका. रस्त्याला तडा गेला, रस्ता खराब झाला तर मी कॉन्ट्रॅक्टरला बुलडोजर खाली टाकीन, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केलं आहे.

नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी वाशिमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी वाशिममध्ये दहा हजार कोटींचे कामे पूर्ण होतील, असं नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितलं.

राजकारणात खोटं बोलायच काम नाही. मी निवडणुकीत बॅनर लावणार नाही. कोणाला देशी-विदेशी दारू पाजणार नाही. मी पैसे खाऊ घालणार नाही आणि खाणार नाही. फक्त सेवा करायची, असं नितीन गडकरी म्हणाले.

मी 45 वर्षांपासून मंत्री आहे. पण विमानतळावर मला घ्यायला कुत्रही येत नाही. मला सुरक्षा असल्यामुळे केवळ पोलीस असतात. कोणी हार घेऊन येत नाही, फुला हारात काही नाहीये, कामे झाली पाहिजेत, असंही नितीन गडकरी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-