सांगली | बाप्पाचं आगमन होऊन 9 दिवस झाले आहे. मात्र आता त्याला निरोप द्यायची वेळ आली आहे. त्यामुळे संपुर्ण राज्यात दर वर्षी प्रमाणे यंदाही आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त थाटात मिरवणुकीचं आयोजन करतात.
या वर्षी सरकारने गणपती मिरवणुकीत डीजे साठी परवाणगी दिली असली तरी मात्र त्याच्या आवाजाचं भान राखलं पाहिजे. सांगली येथे सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकीत डीजेच्या आवाजाने दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तासगाव तालुक्यातील कवठेएकंदमधील शेखर पावशे आणि वाळवा तालुक्यातील दुधारीमधील प्रवीण शिरतोडे या तरुणांचा सोमवारी रात्री मृत्यू झाला.
कसा झाला मृत्यू?
सोमवारी रात्री 7 वाजता प्रवीण शिरतोडे कामावरून घरी येत असताना त्याची दुचाकी बंद पडली. काही अंतर पार करत तो घरी पोहचला आणि त्यानंतर तो लगेच मंडाळाच्या परिसरात मिरवणुकीत सहभागी झाला. डीजेचा दणदणाट आवाजामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि मित्रांसोबत नाचत असताना तो चक्कर येऊन खाली पडला. त्याला मंडाळातील काही पोरांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं मात्र डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
तर दुसरीकडे कवठेएकंदमधील शेखर पावशे यांना डीजेचा आवाज सहन न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. आश्चर्य म्हणजे शेखर पावशे यांची 10 दिवसांपूर्वीच हृदयाची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली होती. शेखर सुद्धा रात्री गणेश मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यांना देखील डीजेचा आवाज सहन न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
थोडक्यात बातम्या-
राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ दिवशी दिली सुट्टी
“भाजप गंजलेला बांबू तर तुमची उबाटा म्हणजे पवारांनी थुंकलेली सुपारी”
…तोपर्यंत चप्पल घालणार नाही म्हणणाऱ्या गुरुजींचे मनसेने धुतले पाय, चप्पलही घातली!
भाजप नेत्याचे आधी अजित पवारांना टोमणे, नंतर काढला पळ!, बघा नेमकं घडलं काय
आमदार अपात्रतेसंदर्भात मोठी घडामोड, अखेर अध्यक्षांकडून तारिख जाहीर!