नांदेड | महाराष्ट्रात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असताना दिसत आहे. शिवाय आपण अनेकवेळा पाहिलं की आरोपींना आता पोलिसांचा सुद्धा धाक राहिला नाहीये. आजकाल आरोपी सुद्धा पोलिसांवर (Police) हल्ला करत असतात. असाच काहीसा प्रकार नांदेड येथे घडला.
नांदेड (Nanded) जिल्ह्यात आरोपीला (Accused) पडकत असाताना पोलिसांवर खंजरने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे सगळीकडे एकच गोंधळ उडाला. याआधी आरोपीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस त्याला पकडत असताना त्यांनी पोलिसांवर खंजरने वार केला यानंतर पोलिसांनी शिताफीने त्याच्या पायावर गोळी झाडून त्याला जायबंदी केलं.
आरोपी-पोलिसांमध्ये नेमकं काय घडलं?
समोर आलेल्या माहिती नुसार शेख आवेझ उर्फ अबू शूटर (Nusar Shaikh Avez) आणि दिपक बोकरे अशी (Dipak Bokre) आरोपींची नावं आहेत. या दोघांवर या आधी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या दोघांना पकडण्यासाठी पोलीस त्यांचा शोध घेत होते. हे दोघेही तरोडा नाका भागात असल्याची माहिती गुप्त बातमीदारांतर्फे पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी यांचा पाठलाग सुरु केला असता त्यांना बघून दोन्ही आरोपी पळत सुटले. एका शाळेजवळ अबु शूटर याने विद्यार्थ्याची स्कूटी हिसकवण्याचा प्रयत्न केला. पुढे त्याला पोलिसांनी गाठले. तेव्हा अबू शूटर याने खंजरने पोलिसांवर हल्ला केला. यात पोलिसांना दुखापत झाली. प्रतिउत्तरात पोलिसांनी अबू शूटरच्या पायावर गोळी झाडून त्याला अटक केली.
थोडक्यात बातम्या-
DJच्या आवाजामुळे दोन जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं???
राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ दिवशी दिली सुट्टी
“भाजप गंजलेला बांबू तर तुमची उबाटा म्हणजे पवारांनी थुंकलेली सुपारी”
…तोपर्यंत चप्पल घालणार नाही म्हणणाऱ्या गुरुजींचे मनसेने धुतले पाय, चप्पलही घातली!
भाजप नेत्याचे आधी अजित पवारांना टोमणे, नंतर काढला पळ!, बघा नेमकं घडलं काय