मुंबई | भाजप नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) कायम विरोधी पक्षावर टिका करताना दिसतात. नुकतंच त्यांनी ठाकरे गटावर जोदार हल्लाबोल केला आहे. काॅंग्रेस विषयी जर काही बोललं की राऊतला लाल हिरव्या मिरच्या लागतात. शिवाय काॅंग्रेसला जेवढं झोंबलं नाही तेवढं राऊतला झोंबतं. सध्या सामना हा काॅंग्रेसचा नवा मुखपत्र आहे, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली आहे.
भाजप जर गंजलेला बांबूू आहे तर मग तुमची उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे शरद पवारांनी थुंकलेली सुपारी, अशा शब्दात नितेश राणेंनी ठाकरे गटाला धारेवर धरलं आहे. नितेश राणे म्हणाले की अरबननक्षल आणि संजय राऊत हे समान वाटतात त्यामुळे केंद्र सरकारने अरबननक्षल आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांचे संबंध आहेत का? याचा तपास करावा.
नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. जेव्हा उद्धव ठाकरे सिरीयस होते त्यावेळेस त्यांचा मुलगा आदितय ठाकरे प्रदेश दौऱ्यावर होता. आपले वडील अजारी असताना मी कसा मुख्यमंत्री बनेल असं त्याला वाटत होतं. शिवाय आदितय ठाकरेंनी आपल्या आजोबांची पुण्यतिथी आहे म्हणुन दौरा रद्द केला होता. असं विकृत पोरगा कोणालाही होऊ नये असं राणे म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
मेट्रोमध्ये कपलचे अश्लिल चाळे, व्हिडीओ व्हायरल
राजकारण्यांची धक धक वाढणार!, ‘ही’ बडी अभिनेत्री निवडणुकीच्या रिंगणात?
सीमा हैदर मायदेशी परतणार, मोठं कारण आलं समोर