एकनाथ शिंदेंची धाकधूक वाढली; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) 1 ऑक्टोबरपासून परदेश दौऱ्यावर जाणार होते. परंतु हा परदेश दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. 10 दिवसांच्या या परदेश दौऱ्यात ते बर्लिन आणि लंडन या शहरांना भेटी देणार होते. मात्र आमदार अपात्रतेप्रकरणी सध्या विधानसभा अध्यक्ष सुनावणी घेत आहेत. त्यामुळेच हा दौरा पुढे ढकलला असल्याचं बोललं जात आहे.

उद्योग तंत्रज्ञानांशी संबधित करार या दौऱ्यामध्ये केले जाणार होते. तसेच तेथील मराठी भाषिक जनतेशी संवाद मुख्यमंत्री शिंदे साधणार होते. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि प्रशासकिय अधिकारीही उपस्थित राहणार होते. पण त्यांचा हा पूर्वनियोजित दौरा पुढे ढकलल्याचं कळतंय.

सध्याच्या राजकीय घडामोडी आणि काही वैयक्तिक कारणांमुळे हा दौरा मुख्यमंत्र्यांनी पुढे ढकलल्याची माहिती आहे. पुढे कधी हा दौरा आखला जाईल याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

शिवसेना आमदार अपात्रते संदर्भात सध्या विधान भवनाच्या मध्यवर्ती कार्यालयात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणी घेत आहेत. एकनाथ शिंदे कोणत्याही क्षणी अपात्र होऊ शकतात, ही शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शिंदेंच्या बाजूने मोठी धाकधूक वाढली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-