…नाहीतर दिल्लीत जाऊन मोदींना घाम फोडणार!; महाराष्ट्रातले शेतकरी आक्रमक

नाशिक | नाशिक (Nashik) येथे मागच्या काही दिवसांपासून कांदा लिलाव बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे लासलगाव येथील काही शेतकऱ्यांनी (Farmers) आक्रमक होऊन सरकारकडे तीन मागण्या केल्या आहेत.

गेल्या सहा दिवसांपासून नाशिक येथे कांदा लिलाव बंद ठेवण्यात आला असून शेतकऱ्यांनी याबाबत बैठक घेतली. या वेळेस लवकरात लवकर यावर विचार करावा, अन्यथा येत्या काही दिवसांत दिल्लीला (Delhi) धडक देऊ, असा इशारा सरकारला देण्यात आला आहे. शिवाय शेतकऱ्यांनी सरकारकडे (Government) तीन मागण्या केल्या आहेत.

शेतकऱ्यांनी केलेल्या तीन मागणया कोणत्या?

कांद्यांवरील 40 टक्के निर्यात शुल्क हटवणे शिवाय नाफेड (NAFED) व एनसीसीएफचा कांदा बंद करणे या सोबतच उर्वरित कांदा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट जमा करावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

याशिवाय उद्या होणाऱ्या बैठकीत या मागण्या मंजूर नाही झाल्यातर थेट दिल्लीत आंदोलन करु असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या बैठकीत राज्य व केंद्र सरकारला देण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

एकनाथ खडसेंचा खळबळजनक दावा!

“माझ्या वडिलांमुळेच…”, गौतमीने सांगितलं आपल्या यशामागचं खरं कारण

लबाड लांडग्याचं पिल्लू म्हणणाऱ्या पडळकरांना अजित पवारांनी झापलं!

“रोहित पवार यांच्यासह सगळे…”; छगन भुजबळ यांच्या वक्तव्याने खळबळ

“मी अजित अनंतराव पवार, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो की…”