नाशिक | राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवार गटावर गंभीर आरोप केला आहे. काही नेत्यांना ब्लॅकमेलिंग केलं गेलंय. तू सही कर नाहीतर काम होणार नाही, असं अजित पवार गटाचे लोक म्हणाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
राेहित पवार यांनी केलेल्या या आरोपावर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. रोहित पवार यांनी मंत्रिमंडळात जाण्याच्या यादीवर सही केली होती, असा दावा त्यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
अजित पवार गटातील एकही माणूस असा नाही जो ब्लॅकमेल करेल. उलट मंत्रिमंडळात जाण्यासाठी रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी सह्या केल्या होत्या, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.
विरोधी पक्षात असल्यावर असं बोलायला पाहिजे, शिवाय आपण विरोधी पक्षाचे आमदार आहोत, हे कसं सिद्ध होईल, त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हा खटाटोप केला आहे, असंही छगन भुजबळ यांनी रोहित पवार यांच्याबद्दल म्हटलं आहे.
शरद पवार म्हणाले होते की कायदेशीर लढाई लढणार नाही, पण आता त्यांनी नोटीस द्यायचं काम चालू केलं आहे. बघू पुढे काय होतंय ते, असंही त्यांनी म्हटलंय.
थोडक्यात बातम्या-
“मी अजित अनंतराव पवार, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो की…”
मोठी बातमी! अजित पवार मुख्यमंत्री होणार?
कुलीचा गणवेश, 756 नंबरचा बिल्ला लावून राहुल गांधींनी केली हमाली