मोठी बातमी! अजित पवार मुख्यमंत्री होणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

बातम्या मिळवा आता थेट तुमच्या WhatsAppवर, पुढील लिंकवर क्लिक करुन आजच जॅाईन व्हा

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 16 आमदार ठरल्यास भाजपने सरकार वाचवण्यासाठी प्लॅन बी तयार ठेवला आहे. शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई झाल्यास अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा काढत असल्याचा आरोप करत, ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टाने यावर सुनावणी घेत राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रतेसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

कोर्टाने एका आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेशही विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले आहेत. या सुनावणीनंतर आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे 3 ऑक्टोबर रोजी शिंदे गटाच्या 16 आमदारांचं भवितव्य ठरण्याची शक्यता आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरवल्यास सरकार वाचवण्यासाठी भाजपने आपला प्लॅन बी तयार ठेवलाय. एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री म्हणून भाजपचा पहिला पर्याय असतील, अशी माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या-