उद्धव ठाकरेंचा हुकमी एक्का अडचणीत!

Uddhav Thackeray

मुंबई | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मुंबई महानगर पालिकेशी संबंधित खिचडी घोटाळ्यात एकनाथ शिंदे गटाचे नेते गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांचे सुपुत्र आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना साथ देणारे अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांची चौकशी होणार आहे. वडिल गजानन किर्तीकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले असताना अमोर किर्तीकर हे मात्र उद्यापही उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहण्यावर ठाम आहेत. इतकेच नाही तर ते ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार देखील असण्याची शक्यता आहे.

बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी आधीपासूनच ठाकरे गटाच्या काही नेत्यांची चौकशी सुरु आहे. काही पदाधिकाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात आली होती. त्यात आता आणखी भर पडली असून खिचडी घोटाळ्यामुळे ठाकरे गट पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

मुंबई महानगरपालिकेचा कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा चर्चेत असतानाच आता आणखी एका घोटाळ्या प्रकरणी कारवाई सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेचा 100 कोटींचा कोविड घोटाळा आता समोर आला आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणात मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, सुनिल बाळा कदम, तत्कालीन सहआयुक्त, नियोजन, बीएमसी, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंखे, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहा कॅटरर्सचे भागीदार, इतर बीएमसी अधिकारी आणि इतर संबंधितांविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. यात आता अमोल किर्तीकर यांचाही समावेश झाला आहे.

दरम्यान, गरिब कामगारांसाठी, ज्यांचं स्वत:चं मुंबईत घर नाही त्यांना लॉकडाऊन काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता. भारत सरकारचंही त्याला समर्थन होतं. याकामगारांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट 52 कंपन्यांना मुंबई महानगरपालिकेनं दिलं होतं. सुरुवातीच्या 4 महिन्यात 4 कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले, असं मुंबई महानगरपालिकेचे म्हणणं आहे. पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचीच चौकशी सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .