संभाजीनगर | राज्य सरकारने आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत मराठवाड्याच्या विकासासाठी मोठे निर्णय घेतले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील विविध योजनांसाठी 45 हजार कोटींची तरतूद करण्यात येत असल्याचं जाहीर केलं.
देशात झेप घेणारा हा मराठवाडा. वर्षभरात आमच्या महायुती सरकारने जे निर्णय घेतले पहिल्या कॅबिनेटपासून ते आजपर्यंत, त्यात सर्व सामान्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून घेतले. आतापर्यंत शेतीला पाणी पाहिजे, जमिनीला पाहिजे ही भावना ठेवून 35 सिंचन प्रकल्पाला सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे 8 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
गोदावरी खोऱ्यात पाणी वळवण्यात येणार आहे. त्यावर 13 हजार कोटीचा खर्च अपेक्षित आहे. सिंचनावरील 14 हजार कोटी आणि गोदावरी खोऱ्यासाठीचे 13 हजार कोटी असे मिळून सिंचनावर एकूण 27 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
जे प्रकल्प प्रलंबित आहेत ते आम्ही मार्गी लावत आहोत. समृद्धी महामार्ग मराठवाड्याला लागून जातो. त्याचा फायदा होईल. औद्योगिक इंडस्ट्री वाढते आहे. त्याचाही फायदा मराठवाड्याला होणार आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी मोठा निर्णय!
- उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; आणखी एक नेता अडचणीत
- नागरिक संतापले! राज्यातील ‘या’ गावात राजकीय नेत्यांना बंदी
- ‘कारण नसताना मला…’; ट्रोलिंगवर अजित पवार स्पष्टच बोलले
- रोटरीची मिलेट जत्रा उत्साहात संपन्न, ‘भरड धान्य’ मुख्य आकर्षण!